Views




*धीर धरा आपण या संकटातून मार्ग काढून पुन्हा उभे राहु', शरद पवारांचा शेतकऱ्यांना 'धीर' देण्याचा प्रयत्न
शरद पवार दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर  त्यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याची पाहणी केली आहे*


उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

 राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेले पिकं पुर्णत: उद्वस्त झाले आहे. कपाशी, ऊस, मका, बाजरी, तूर, पपई अशा अनेक पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाडा, विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली. पवार म्हणाले की, 'धीर धरा आपण यातून मार्ग काढू, यातून आपण लवकरच बाहेर पडू आणि पुढे कष्टाने पुन्हा उभे राहू' असे म्हणत पवार यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
   राज्यातील महाविकास आघाडी सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी असून, शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा आपण भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून, राज्यातील खरीप पिके पुर्णत: खराब झाली आहे. मायबाप सरकारने मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे
 
Top