Views


*श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ...*

  
उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

       उस्मानाबाद,(दि.19)तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ. 
        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर (उद्या) पासून सुरुवात होत आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात अश्व वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.
 
Top