Views


*आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने स्टेट बॅंक आफ इंडिया या बॅंकेमध्ये जनधन खाते उघडण्यास सुरुवात* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने स्टेट बॅंक आफ इंडिया या बॅंकेमध्ये जनधन खाते उघडण्याच्या 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन व महाराष्ट्र डेलि ऑनलाइन टेस्ट सिरिस व मार्गदर्शन सुरू करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्टेट बॅंक आॅफ इंडिया या बॅंकेमध्ये जनधन खाते उघडण्याच्या 2 दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिश्ठान भवन, उस्मानाबाद येथे करण्यात आला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजने अंतर्गत बँकेत खाते काढणे यासाठी उस्मानाबाद शहर  व तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेचा लाभ घेण्यासाठी जनधन खाते काढणे या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरी व ग्रामीण भागातील अनेक गरजू लोकांनी या शिबीरामध्ये आपले खाते उघडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या आणि राणादादा यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून हे शिबिर घेतल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उद्घघाटण पर भाषणामध्ये युवा मोर्चाचे अभिनंदन करून जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदरील शिबीर हे दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यन्त चालणार असून येत्या काळात उस्मानाबाद शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये हे शिबीर घेणार असल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाउ कुलकर्णी, माजी. जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, प्र.का.सदस्य सतिष दंडनाईक, सरचिटणीस नितीन भोसले, प्रदिशिंदे, इंद्रजित देवकते, न.प.गटनेते युवराज नळे, षहराध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक योगेष जाधव, अभिजित काकडे, दाजीप्पा पवार, प्रविण पाठक, अमोल राजेनिंबाळकर, अमित कदम, संदिप इंगळे, प्रितम मुंडे, देवा नायकल, ओम नाईकवाडी, हिंमत भोसले, सुजित साळुंके, सचिन लोंढे, राहुल शिंदे  , राज निकम ,पुजा राठोड, सलमान शेख , खंडू राउत, कुलदिप भोसले, अक्षय भालेराव, दादुस गुंड, सुनील पांगुड़वले ,विठठल कदम, षरीफ षेख, गणेष ऐडके, कृष्णा कुंभार, प्रकाष शिंदे, मकरंद कुलकर्णी, तानाजी गोरे, ऋशभ भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top