Views


*महिला अत्याचाराविरोधी दिशा कायदा कधी लागु करणार,
गुन्हेगारांवर कारवाई करा, अन्यथा मंत्र्यांचे गाड्या अडवु :- चित्राताई वाघ यांचा शासनाला इशारा*


उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

शासन बधीर झाले असुन सध्या त्यांना महीलांचे आक्रोश ऐकू येत नाही, महीलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसंदिवस वाढ होत आहेत, महीला अत्याचाराविरोधी दिशा कायदा कधी लागु करणार, छत्रपती शिवरायांच्या राज्यात महीलावर होणारे अत्याचार सहन करणार नाही असे मत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले. उमरगा चौरस्ता येथे विटभट्टीवरील मजुर महीलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नगर परिषद सभागृहात दि.9 ऑक्टोबर रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धीजीवी प्रकोष्ट प्रदेश संयोजक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष माधुरी गरड, महीला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.मीनाताई सोमाजी, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, प्रदीप शिंदे, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई पांचाळ, आशाताई लांडगे, राजु मिणीयार, सुशांत  भुमकर, बालाजी पवार, बालाजी कोराळे, नरेन वाघमारे, पंकज मोरे, रोहीत सुरयवंशी, विवेकानंद तोडले, तालुका उपाध्यक्षआनिल बिराजदार, नगरसेवक सुनंदा वरवटे, आकाश शिंदे, इराप्पा घोडके, अरुण ईगवे, उपस्थित होते. पुढे बोलताना सौ.वाघ यांनी शासनावर हल्ला चढवत महीलांचे लचके तोडणाऱ्याना शिक्षा करा अन्यथा वेळप्रसंगी मंत्र्यांचे गाडया अडवू असा इशाराही दिला. राज्यात महीलांवर अत्याचारात वाढ होत असताना आजपर्यंत महीला आयोगाला अध्यक्ष का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करून सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अशा घटनेत वाढ होत असल्याचे सांगितले. यावेळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी भाजपाच्या वतीने या पिडीत महिलेला 1 लाख रुपये मदत जाहिर केली. व भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी 5 हजार रुपये या पिडीत महिलेला दिले.
 
Top