*लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा,खेड साखर कारखान्याचा गळीत हंगाम कार्यक्रम संपन्न*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा खेड साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सुरुवात ह.भ.प.महेश महाराज व कारखान्याचे संचालक प्रशांतजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश कोनपुरे, असिस्टंट जनरल मॅनेजर व्यंकटेश वाघोलीकर सर, राजकुमार सगर, चीफ केमिस्ट नरेश रामपुरे, बाराते साहेब, मार्कड साहेब, पंकज पाटील, मोरे गणेश, राम पाटील, अविनाश बिराजदार, सागर राजमाने, राजकुमार काकडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, व्यंकट पाटील, बसवंत हावळे, शेखर पाटील, अजय ढोणे, हाजी बाबा शेख, शंकरआप्पा मुळे, संजय जाधव, बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, अमोल हावळे, यांच्यासह, कारखान्याचे कर्मचारी व शेतकरी, उपस्थित होते.