Views
*भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने लोहारा शहरात गरीब कुटुंबांना किराणा किट, सॅनिटायझर, मास्क वाटप*


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपा व जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी यांच्या वतीने लोहारा शहरातील प्रभाग क्रं.1 मधील गरिब, गरजु, वंचित कुटुंबाना किराणा किट, सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. व तसेच *नेत्रदान संकल्प* केला त्या अनुषंगाने *भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून आरोग्य खात्याला देणयात आले. यावेळी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, विजय महानुर, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तर्गे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाट, लक्ष्मण माने, आरोग्य खात्याचे नुडल ऑफीसर खंडू शिंदे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
 
Top