Views


 *लोहारा तालुक्यातील वडगाव गां साठवण तलावासाठीचे हस्तांतरणासह भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा -- शंकरराव गडाख*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी हस्तांतरणासह भूसंपादन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी दिले. मंत्रालयात दि.14 ऑक्टोंबर 2020 रोजी वडगाव साठवण तलावा विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यासह जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. गडाख म्हणाले, वडगाव प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र सहाशे एकर पेक्षा कमी असल्याने हा साठवण तलाव मृद व जलसंधारण विभागात हस्तांतर हस्तांतर करण्यासाठी प्रकल्पाचे  विभागीय स्तरावर प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक, नकाशे पुस्तिका, बुडीत क्षेत्रातील मूल्यांकने, परिनिरीक्षण टिप्पणी पत्रव्यवहार धारिका व भूसंपादन पत्रव्यवहार इत्यादी अभिलेखे हस्तांतरित करण्यात आले आहेत. सदर प्रकल्प कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रकल्प संखेतून वगळण्यात आला असून जलसंपदा विभागामार्फत निधीची तरतूद करण्यात आलेली नाही असे त्यांनी सांगितले. श्री. गडाख म्हणाले, या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव परिसरातील नगरीकांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा तलाव लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया अधिक गतीने करण्यात यावे.तसेच जलसंपदा  आणि  जलसंधारण विभागाने त्यांच्या कडील प्रक्रिया तातडीने पुर्ण करावी आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश  त्यांनी दिले.

 
Top