*सास्तुर वि.का.से.सह.संस्थेच्या सभासदांना लाभांश जाहीर*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील विविध कार्यकारी सेवा सह.संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या 934 सभासदांना 9% प्रमाणे 1 लाख 75 हजार रुपयांचा लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे संस्था मार्गदर्शक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी जाहीर केले. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील वि.वि.का. स. सेवा संस्थेच्या कार्यालयात दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे एकुण 934 सभासद असून गेल्या 15 वर्षांपासून बँक स्तरावर संस्थेची 100 टक्के वसुली आहे. आहे तर संस्थेची मुदतठेव रक्कम 40 लाख रुपये आहे. संस्थेची आजपर्यंत शेतकरी, सभासद, हितचिंतक यांच्या पाठबळावर यशस्वीपणे वाटचाल सुरू असून सर्व सभासदांना 9 टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्था मार्गदर्शक राहुल पाटील यांनी जाहीर केले. यावेळी संस्था मार्गदर्शक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, व्हाईस चेअरमन आप्पाराव कुर्ले, सचिव र्व्ही.जी. पुर्णे, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, व सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी उपस्थित होते. यामुळे शेतकरी सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.