Views


   *धानुरी गावातील रस्ते मजबुतीकरण करुन गटारी करण्याची मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय धानुरीला ठाळे ठोकुन ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विविध रस्त्यांवर चिखल साचला असुन गटारीअभावी रस्त्यावर पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावातील चिखल होणा-या रस्त्याचे मजबुतीकरण करुण गटारी कराव्यात. अन्यथा  ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकुन ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी दि.15 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी यापैकी चिखल झालेल्या रस्त्यावर तात्काळ खडक टाकून देण्यात येईल, एक रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातील निधी पण प्राधान्याने याच रस्त्यावर खर्च करण्यात येईल व उर्वरीत रस्त्याचे काम मग्रारोहयोमधुन पंधरा दिवसात सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी प्रशासक आर.एस.पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राम यादव, विठ्ठल बुरटुकणे, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव, आकाश जाधव, नागनाथ साळुंके, विनोद साळुंके, आकाश सुरवसे, आनंत साळुंके, संतोष यादव, खंडू साळुंके, रविंद्र साळुंके, महादेव बुरटुकणे, आदेश साळुंके, अभिजित साळुंके, नागनाथ पांचाळ, विनायक साळुंके, पोलिस हवालदार पी. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top