Views


*महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार*
 

कळंब: -(प्रतिनिधी) 

   महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दि 2, शुक्रवार रोजी उस्मानाबाद येथील संत सेना महाराज मंदिर सभागृहात  प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे  व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक आयोजित करण्यात आली.   या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, सर्वानुमते वधूवरसूचक कळंब  तालुका अध्यक्ष पदी दशरथ किसनराव मंडाळे यांची निवड करण्यात आली, व महिला आघाडीच्या कळंब तालुका अध्यक्ष पदी सौ रुक्मिणी शिवराज पौळ व महिला कळंब शहर अध्यक्ष पदी स्मिता विष्णू मंडाळे, व युवक कळंब शहर अध्यक्ष पदी ओंकार मंडाळे व उपअध्यक्षपदी रणजित शेंद्रे व कार्याध्यक्ष पदी सिद्धेश्वर डिगे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दि 3, शनिवार रोजी इंगळे मंगलसेवा येथे यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेमचंद गोरे, बापूराव सुरवसे, विष्णू मंडाळे, आबासाहेब मंडाळे, युवराज पंडित, सचिन मंडाळे,  सौ स्मिता मंडाळे,  सौ रुक्मिणी पौळ,सौ सुकेशिनी काळे, सौ अर्चना मंडाळे, सौ कविता गोरे, सौ स्वाती पंडित आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होते.
 
Top