Views


*केंद्र सरकारचे कृषी विधेयक 2020 शेतक­यांच्या हिताचे -- रामदास कोळगे*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

केंद्र सरकारने भारतातील शेतक­यांना कृषी विधेयक 2020 लागू करुन शेतक­यांना आपला स्वत:चा माल कुठेही विकण्याचे व शेतीमालाचा कंपन्याबरोबर करार करुन जास्त पैसे मिळविण्याचे विधेयक पास करुन घेऊन शेतक­यांना मुक्त केले त्यामुळे कृषी विधेयक 2020 हे शेतक­यांच्या हिताचे असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी व्यक्त केले. रुईभर येथे शुक्रवार दि.23 रोजी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर पुजन व पंतप्रधानाचे अभिनंदन पत्र व मुख्यमंत्री यांनी कृषी विधेयकाला दिलेली स्थगिती उठवावी म्हणून पोस्टकार्ड पाठविणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी गावातील प्रगतशील शेतकरी शाहुराज तिर्थकर यांच्या ट्रॅक्टरचे जेष्ठ शेतकरी दिगंबर वडवले यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व पंतप्रधानांना शंभर शंभर पोस्ट कार्ड पाठविण्यात आले. यावेळी कोळगे पुढे बोलताना म्हणाले की, या तीन्ही विधेयकापुढे शेतक­यांना येणा­या काळात त्यांच्या मालाला चांगला भाव मिळून येईल. त्यामुळे शेतक­यांना चांगले दिवस येतील ही विधेयक चालू केली असली तरी बाजार समिती सुरुच राहणार आहे. किमान हमी भाव ही कायम राहणार आहे. या विधेयकामुळे शेतक­यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा जाहीर केलेले आहे. परंतू काँग्रेससह विरोधी पक्षांना कोणताही मुद्दा नसल्यामुळे काँग्रेसचे शेतक­यांना बिचकवण्याचे काम सुरु आहे. अशा भुलथापांना शेतक­यांनी बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच बालाजी कोळगे, राजेंद्र गव्हाणे, पोपट पाडूळे, राजेंद्र भणगे, शंकर चव्हाण, धनंजय चव्हाण, नागनाथ कोळगे, नारायण वडवले, संतोष शिंदे, गणपत तिर्थकर, बलभिम कस्पटे, किसन पवार, हाजीमलंग पठाण, माणिक शितोळे, अनिल भोयटे, अशोक सिरसाटे, अमोल जठार, माऊली कोळगे, गणेश शिंपले, बाबा चव्हाण, मारुती धुमाळ, उमेश कोळगे, पोपट आगळे, सागर तिर्थकर, अमरसिंह कोळगे, अनिकेत कोळगे, दिलीप कोळगे, दयानंद लोमटे, बालाजी लोमटे, नितीन शिंपले, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top