Views


*लोहारा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडित मुलगी कोमात, तीन अल्पवयीन मुलांविरूध्द पोलीस ठाण्यात पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील एका गावात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून अखेर दि.20 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात 3 अल्पवयीन मुलांविरूध्द पोक्सा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.18 आक्टोबर रोजी गावातीलच तीन मुलांनी दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. अत्याचार झाल्याबाबत मुलीने घरी सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी दि.19 ऑक्टोबर रोजी मुलीची प्रकृती खालवल्याने तीच्या पालकांनी तीला स्पर्श ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी तीच्या आई, वडीलांनी उलट्या, जुलाब होत असल्याचे सांगितले होते. परंतु डॉक्टरांना अत्याचार झाल्याचा संशय आला. याबबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिला साहयक, पोलिस निरीक्षक यांच्यासोबत पीडित मुलीला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडिताच्या वडिलांनी मंगळवारी रात्री उशीरा लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून तीघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीवर लातूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तीला सामूहिक अत्याचाराचा  मानसिक धक्का बसला आहे. तीची प्रकृती गंभीर असून ती सद्या कोमात आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलिस पथक गावात दाखल झाले असून कसून तपास करीत आहेत.
 
Top