Views


*कळंब तालुका भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा*

कळंब:-(प्रतिनिधी)

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दसऱ्याचे औचित्य साधून लोकनेते पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट बीड येथून ऑनलाइन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु राजकीय द्वेषा मुळे या मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्या जास्त दाखवून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी लोकनेते पंकजा मुंडे यांच्या वरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. तसेच आत्ता काही दिवसापूर्वी कळंब तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते या पावसाचा परिणाम म्हणून कळंब महसूल सर्कल मधील शेतीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी हद्दीतील  सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान द्यावे या मागण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या वतीने आज मा. तहसीलदार साहेब कळंब यांना तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्या सह निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मिनाज शेख,संजय जाधवर,दिलीप पाटील,राजा टोपे,अरुण चौधरी,प्रशांत लोमटे, संदीप बाविकर, इम्रान मुल्ला,प्रदीप फरताडे,प्रवीण यादव,अभय गायकवाड,राजा टोपे, गोविंद गायकवाड आदीने स्वाक्षऱ्या केल्या आहे..
 
Top