Views


*लोहारा तालुक्यातील एका गावातील दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोक्सा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून पीडितेचे आर्थिक पुनर्वसन करावे, या मागणीसाठी विविध संघटनानी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घटनेचा निषेध केला*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील एका गावातील दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोक्सा कायद्या अंतर्ग कठोर कारवाई करून पीडीतेचे आर्थिक पुनर्वसन करावे, या मागणीसाठी विविध संघटनेच्यावतीने दि.26 ऑक्टोंबर 2020 रोजी लोहारा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला. दहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात दि.18 ऑक्टोंबरला घडली. पोलसांनी आरोपीवर पोक्सा काद्या अंर्गत गुन्हा दाखल केला. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेचा सर्वस्तारातून तीव्र निषेध होत आहे. आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धनगर सकल समाज, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती कामगार संघटना, ग्रामीण समाज सुधारक संस्था, अदि सामाजिक संघटनेच्या वतीने दि.26 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरवात झाली. महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला, पीडितेला न्याय द्या, महिलावरील अत्याचार थांबवा, महिलांना संरक्षण द्या, आरोपीवर कठोर कार्यवाही करा, अशा आशयाचे फलक घेऊन महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक महिलांनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या सामूहिक अत्याचाराच्या घटनेचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध केला. नऊ वर्षाची मुलगी श्रीदुर्गा लांडगे हीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी अत्याचार करणाऱ्या तीनही आरोपींवर पोक्सा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून पीडितेला न्याय द्यावा, तीचे आर्थिक व मानसिक पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांना देण्यात आले. यावेळी उमाकांत लांडगे, गणेश सोनटक्के, प्रकाश घोडके, रविकिरण बनसोडे, आसिफ मुल्ला, डॉ.श्रृती सोनटक्के, कालिंदा घोडके, पौर्णिमा लांडगे, स्वाती जाधव, तानाजी गायकवाड, विष्णू वाघमारे, तिम्मा माने, महादेव वाघमारे, रब्बानी नळेगावकर, अशीष पाटील, राजेंद्र घोडके, अभय कुलकर्णी, दगडू तिगाडे, विक्रांत संगशेट्टी, बालाजी माटे, नवनाथ बनसोडे, उमरगा, बालाजी चव्हाण, राणी गायकवाड, संजय दंडगुले, लिंबीका गायकवाड, सुवर्णा गोरे, सरोजा रोडगे, अमोल धोत्रे, पांडुरंग चव्हाण, गोपाळ बंडगर, बालाजी सुर्यवंशी, शालू रसाळ, सरस्वती गोरे, धनश्री गोरे, मनिषा कोळी, यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. मुरूम, उमरगा येथील पोलिस कुमक मागविण्यात आली होती. शिवाय उस्मानाबाद येथील दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते.

 
Top