Views*कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाच्या उपाध्यक्षपदी  परवेज मुल्ला यांची नियुक्ती!*

 कळंब:-(प्रतिनिधी)

 कळंब तालुका मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उन्मेष पाटील हे होते. यावेळी कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाच्या उपाध्यक्ष पदी परवेज मुल्ला यांची तर तालुका समन्वयक पदी राहुल हौसलमल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी कळंब तालुका पत्रकार मंडळाचे पार्श्वनाथ बाळापुरे,धनंजय घोगरे, बालाजी आडसुळ, अशोक शिंदे,सय्यद खादीम, हनुमंत पाटोळे आदींनी नुतन पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छा देवून सत्कार केला.
 
Top