Views


*श्रीक्षेत्र तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव 2020 हा अत्यंत साधेपणाने साजरा होणार....*
                 
                   
*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

उस्मानाबाद,(दि.02)राज्य शासनाच्या महसूल व वने आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिसूचना गृहविभागाचे दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी चे पत्र तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजीच्या आदेश अन्वये धार्मिक ठिकाणे व प्रार्थना स्थळे बाबतीत दिनांक 1 आक्टोबर 2020 ते 31 आक्टोबर2-020 या कालावधीकरीता मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर करीता पुढील मार्गदर्शक सुचना लागु राहतील असे उपरोक्त आदेशान्वये कळविण्यात आलेले आहे.
1) या कालावधीत मेळाव्यामध्ये /समारंभामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.
2) महाराष्ट्र शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशानुसार धार्मिक ठिकाणे व प्रार्थना स्थळे शासनाचे पुढील आदेशापर्यंत जनतेसाटी बंद राहतील.
3) सार्वजनिक मेळावे व समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील.
4) गरबा, दांडीया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार नाहीत.
5) वरील संदर्भीय परिपत्रकान्वये व साथीच्या आजाराची गांभीर्यता लक्षात घेवून श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देविजीचा शारदीय नवरात्र महोत्सव 2020 हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
6) या कालावधीत भक्तांना व भाविकांना दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही.
7) Covid-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापूर शहरातील जनतेस किंवा भाविकास महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
8) उपरोक्त कालावधीमध्ये भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास, भाविकास श्रीक्षेत्र तुळजापूर शहरास प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यांत येत आहे.
9) श्रीदेविजींचे शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजा-यासाठी आवश्यक असणारे पूजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. सदर परवानगी उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, व मंदिर तहसीलदार यांच्या मान्यतेने देण्यात येईल.
10)कोरोना व्हायरस covid-19 या विषाणुचा प्रसार होवू नये म्हणून सदर कालावधीत मंदिर संस्थानकडून रँपीड अँटीजन टेस्टचा तपासणीसाठी अवलंब केला जाणार आहे.
11)दैनंदिन निर्जतुकीकरण,सामाजिक अंतराचे पालन,आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर सर्वांसाठी बंधनकारक राहील.
12)या कालावधीत मंदिरात किंवा मंदिर परिसरात मद्यपान,पान,गुटखा,तंबाखू इत्यादी तत्सम पदार्थांचे सेवन करता येणार नाही.
13)घरी रहा सुरक्षित रहा या संकल्पनेतून शासदीय नवरात्र महोत्सवात भाविक भक्तांनी श्रीदेविजीचे दर्शन www.shrituljabhavani.org या मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावरुन घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन,तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top