Views
शेतकर्‍यांचा सन्मान व बळ वाढवणारे कृषी विधेयक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले असून कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन याबाबत जनजागृती करावी -- केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील 


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

शेतकर्‍यांचा सन्मान व बळ वाढवणारे कृषी विधेयक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले असून कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन याबाबत जनजागृती करावी असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांनी उस्मानाबाद येथे दि. 4 ऑक्टोंबर 2020 रोजी  केले. उस्मानाबाद जिल्हा पदाधिकार्‍यांच्या प्रथमच आयोजित केलेल्या बैठकीस ते मार्गदर्शन करत होते. यावेळी महाराष्ट्र भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसिंह ठाकुर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, खा.डॉ.भागवत कराड, जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.स.अॅड.मिलिंद पाटील, अदिंची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पदाधिकारी  निवडीनंतर प्रथमच जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे प्रास्ताविक  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी करून 
पक्षस्थिती आढावा समोर ठेवला. त्यानंतर दानवे पाटील म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशात एकामागून एक  लोककल्याणकारी निर्णय करत असून नुकतेच शेतकर्‍यांना उभे करणारे कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधक निव्वळ विरोध करीत सुटले आहेत. हा अपप्रचार असून कृषी विधेयक हे शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असल्याने कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन जनजागृती करावी. व येणार्‍या पदवीधर निवडणुकीत भाजपा उमेदवार निवडून येईल यासाठीही कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही शेवटी संगितले. कोरोना काळात जिल्ह्यात पक्षाकडून मोठे कार्य केलेल्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस ॲॅड. नितीन भोसले यांनी केले. या बैठकीस प्र.का.स.ॲड.व्यंकटराव गुंड, प्र.का.स. ॲड.अनिल काळे, प्र.का.स.सतीश दंडनाईक, प्र. का.स.अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, जि.प.समाज कल्याण माजी सभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभय भैय्या चालुक्य पाटील, रामदास अण्णा कोळगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, जि.प.समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, महिला मोर्चा  जिल्हाध्यक्ष माधुरी गरड,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे उमरगा, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील लोहारा, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील परंडा, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे तुळजापूर, तालुका अध्यक्ष अजित पिंगळे कळंब, यांच्यासह  तालुकाध्यक्ष, विविध आघाडी व मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

 
Top