Views


*श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा संपन्न*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा बसवराज पाटील यांच्या हस्ते कारखान्यात दि.11 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न झाला. यंदाच्या हंगामासाठीच्या सर्व मशीनरीची कामे पूर्ण करण्यात आली असून, ऊस तोडणी वाहतूकीसाठी  लागणारी यंत्रणापण सज्ज झाली आहे. यावर्षी भागातील ऊसाची उपलब्धता विचारात घेता, कारखान्याच्या संचालक मंडळाने 5 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्यिष्टये निश्चित केले आहे. यंदाचा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार असून गेल्यावर्षी गाळपास ऊस दिलेल्या शेतकरी बांधवांना प्रति मेट्रीक टन शंभर रुपयाचा हप्ता  हंगाम सुरु होण्यापूर्वी  देण्यात येणार आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी बांधवांनी आपल्या विठ्ठलसाई कारखान्यास जास्तीत-जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करण्याचे आवाहन बसवराज पाटील यांनी यावेळी केले. सध्या कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेवून कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करुन संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकमियाँ काझी, संचालक विठ्ठल पाटील, केशव पवार, दिलीप पाटील, शरणप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, विट्ठल बदोले, राजीव हेबळे, माणिक राठोड, दत्तु भालेराव, शिवलिंगप्पा माळी अँड.विरसंगप्पा आळंगे, सुभाषचंद्र पाटील, प्राचार्य डॉ.दिलीप गरुड, आप्पासाहेब हळ्ळे, प्रमोद कुलकर्णी, मल्लिनाथ दंडगे, कार्यकारी संचालक एम.बी.अथणी आदींसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित  होते.

 
Top