Views


*राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ उस्मानाबाद काँग्रेसच्या वतीने मोदी-योगी यांच्या प्रतिमेस जोडे मारून दहन....*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केली.याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे (दि.01)गुरुवारी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.छत्रपती शिवाजी चौकात हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी "राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है.." यासह मोदी-योगी मुर्दाबाद च्या जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, 
युवक काँग्रेसचे माजी सचिव जावेद काझी, युवकचे प्रदेश सचिव  उमेश राजेनिंबाळकर, बापू शेळके, सुरेंद्र पाटील, सलमान शेख, विश्वजित शिंदे, राजाभाऊ नळेगावकर, युवक शहराध्यक्ष इलियास खान, अदनान सिद्दीकी, प्रेम सपकाळ, बंटी कादरी, अखिल काझी, समाधान घाटशिळे, मलंग शेख, इम्रान हुसैनी, राहुल लोखंडे, झुल्फिकार काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top