Views


  *लाेहारा तालुकयातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या साेयाबीन, ऊस, अदि पिकांचे पंचनामे ऑनलाईन पद्धतीने न स्विकारता ऑफलाइन पद्धतीने स्विकारून पीक विम्यासह अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी -- भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील*


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीन, ऊस व आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ऑनलाइन पद्धतीने न स्विकारता ऑफलाइन स्विकारून पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा अनुदायी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात यंदा उडीद, ऊस यासह फळबागा, भाजीपाला, कोथिंबीर, आदी पिके जोमात आली होती. परंतु परतीच्या पावसाने गेल्या महिन्यात धुमाकूळ घातल्याने हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उडीद मुगाचे अतोनात नुकसान झाल्याने पीक पाण्यात गेले असून ऊसाचे फड जाग्यावर आडवे पडून भुईसपाट झाले आहे. शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी पिक विमा कंपनीने व शासनाने ॲपवर कॅमेऱ्यात नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे फोटो व अर्ज हे पीक विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची जाचक अट घालण्यात आली आहे. वास्तविक पाहता तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे अनराईड मोबाईल फोन नसल्याने शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे फोटो कसे काढणार व ऑनलाईन अर्ज भरू शकणार नाही. त्यामुळे ही जाचक अट रद्द करून शेतकऱ्याकडून फक्त अर्ज, विमा पावत्या, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स मागून घ्यावेत व स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक यांच्यामार्फत सरसगट पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याचे अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा  जिल्हा चिटणीस  विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस नेत‍ाजी शिंदे, आेबिसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा माेर्चा बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमाेद पाेतदार, जिल्हा कार्यकारिणी सदसय कमलाकर सिरसाट, यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.
 
Top