Views


*हातसर सामूहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी रिपब्लिकन सेना उस्मानाबाद*

कळंब:-(प्रतिनिधी)

हातसर सामूहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी रिपब्लिकन सेना उस्मानाबादच्या वतीने मा केंद्रीय गृहमंत्री  यांना उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत निवेदन देऊन मागणी  करण्यात आली.  उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यातील चंदप्पा परिसरातील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे. तिला बोलता येऊ नये म्हणून जीभ कापण्यात आली तिला चालता येऊ नये म्हणून तिच्या मनक्याचे हाड मोडण्यात आले अशा अमानुष पणे बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अशा अमानुष पणे माणूसकिला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. त्यातील आरोपी संदिप ठाकूर, लवकूश ठाकूर, राजकुमार ठाकूर या नराधमांची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मा केंद्रीय गृहमंत्री  यांना उपविभागीय अधिकारी  यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  अनिल हजारे,रिपब्लिकन सेना तालुका प्रमुख कळंब लाखन गायकवाड जिल्हा युवक अध्यक्ष रिपब्लिकन सेना उस्मानाबाद  स्वप्निल शिंगाडे,अकिब पटेल,सायस हजारे, अप्पासाहेब हजारे, नीतीन वाडे ,प्रतीक हजारे, सूरज वाघमारे, सिराज शेख ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
 
Top