Views


*आ. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून परंडा येथे नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद...*
 
 
उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

आज परंडा तालुक्यातील भोत्रा परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची माजी मंत्री आ.प्रा.तानाजीराव सावंत साहेबांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून धीर दिला. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांस तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.सदस्य दत्ता आण्णा साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, RPI चे संजयकुमार बनसोडे, तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, सुभाष सिद्दीवाल, मेघराज पाटील, रणजित पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, तालुका कृषी अधिकारी मोरे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, भोत्रा ग्रामस्थ, शेतकरी वर्ग उपस्थित होते.
 
Top