Views
*महिलांवरील होणारे अत्याचार थांबवीण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल -- भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.आरती सतिश गिरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

महिलांवरील होणारे अत्याचार थांबवीण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या लोहारा तालुकाध्यक्षा सौ.आरती सतिश गिरी यांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत असून महाराष्ट्र व जिल्ह्यात बलात्कार,  अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.  त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातील कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील अत्याचार व विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. या सर्व बाबी वरून असे स्पष्ट होते की,  हे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती व असंवेदनशील व निष्क्रिय आहे. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील पहिल्या अत्याचारांच्या घटना गांभीर्याने घेत नाही. यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. महिलांच्या सुरक्षेबाबत निष्क्रिय झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी व महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसंबंधी शासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.आरती सतीश गिरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य पुजा बालाजी चव्हाण, कुसुम पोतदार, उषा गोसावी, सोजरबाई साळुंखे, नागरबाई शेवाळे, कांता गोसावी, सोनाली सातपुते, विजया गिरी, प्राची गिरी, आदी उपस्थित होत्या.
 
Top