Views




*शेतकऱ्यांच्या हिताच्या केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयक 2020 ला राज्य शासनाने दिलेल्या स्थगिती आदेशाची होळी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 70 वर्षांपासून कृषी सुधारणा विधेयकापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विधेयक 2020 हे लोकसभेत व राज्यसभेत बहुमतांनी पास करून घेऊन भारतातील शेतकऱ्यांना शेतीमालाची बाजारपेठ मुक्त करून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. केंद्र सरकारने पारित केलेले विधेयक भारतातील सर्व राज्य सरकारांनी लागू केली आहेत. परंतु महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या सरकारने केंद्र शासनाचे कृषी विधेयक लागू न करता त्याला स्थगिती दिली आहे. त्याचा निषेध म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता उमरगा यांच्या वतीने उमरगा शहरात महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या स्थगिती आदेशाची होळी करुन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी अभय भैया चालुक्य पाटील (माजी बांधकाम सभापती जी.प.उस्मानाबाद ), माधव पवार (जिल्हा सरचिटणीस भा.ज.पा ), कैलास शिंदे (तालुकाध्यक्ष उमरगा), हंसराज गायकवाड (उपनगराध्यक्ष, नगर परिषद उमरगा ), मणियार (जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी), दिग्विजय शिंदे (सभापती समाज कल्याण जि.प.उस्मानाबाद ), पंकज मोरे, उमेश स्वामी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

 
Top