Views


माझं कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक गाव व वार्ड पातळीवर आरोग्य व स्वयंसेवकाच्या चमुने घरोघरी तपासणी येत असुन या मोहिमचा व मेडीकल मोबाईल युनिट चा शुभारंभ दि.30 सप्टेंबर 2020 रोजी लोहारा तालुक्यातील स्पर्श रुग्णालय सास्तुर येथे जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेत राबविण्यात येणाऱ्या सेवे बाबत माहिती देतांना म्हणाले  की, कोरोना विषाणु व्हायरस उपचार बरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची तपासणी करण्यात येत असुन कुटुंबातील आजाराबाबत माहिती घेण्यात येत आहे. त्यामध्ये ताप, खोकला, सर्दी, रक्तदाब व इतर आजाराची माहिती पथकाव्दारे घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी स्वःता बरोबर कुटुंबाची काळजी घेण्यात यावी व घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे यावेळी सांगीतले. तसेच "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मेडीकल मोबाईल जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सदस्य जिल्हा परिषद श्रीमती शितलताई राहुल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच व्ही वडगावे, जिल्हा परिषद हॅलो मेडीकल फाउंडेशन अणदुर डॉ.शशीकांत अहंकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कठारे, श्री रमाकांत जोशी स्पर्श रुग्णालय सास्तुर, आदि, उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) येथील सर्वेक्षण करीत असलेल्या पथकास भेट देवुन मार्गदर्शन केले व तेथील उपकेंद्रास भेट देवुन पाहणी व कामाचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमास स्पर्श रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top