Views


*बानगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड इडा- जवळा चे चेअरमन माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या हस्ते 2020-21 च्या गळीत हंगामाचा गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ*

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

दिनांक 28 ऑक्टोबर 2020 वार बुधवार रोजी भूम परंडा  वाशी तालुक्यातील विकासाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बानगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड इडा- जवळा या कारखान्याचे सण 2020-2021 या गळीत हंगामाचा शुभारंभ भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार तथा बानगंगा साखर कारखान्याचे  चेअरमन माननीय राहुल भैया मोटे साहेब यांच्या हस्ते व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सचिन जी शिंगारे साहेब व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला.
         त्यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन महादेव आबा खैरे, संचालक तात्या साहेब गोरे, मधु भाऊ मोटे , दादासाहेब पाटील सोनारिकर,  विश्वनाथ आबा खुळे, भाऊसाहेब खरसडे,  मारुती मासाळ,  भाऊसाहेब नलवडे, विष्णू नाना शेवाळे , रामभाऊ जाधव, गौरी भाऊ साठे, डॉक्टर दशरथ घोगरे, या संचालकासह भूम तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे,  राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top