Views


*रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्यावतीने कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 वर्षेनुवर्षे प्रलंबित असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) - शिंदेवाडी ते मसोबापाटी या रस्ता कामाची ई-निविदा निघाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण होणार असून ग्रामस्थांची अडचण दूर होणार आहे. मागणीची तातडीने दखल घेवून निविदा काढल्याबद्दल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांचा सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते दि. 28 ऑक्टोबर 2020 रोजी सत्कार करण्यात आला. सारोळा-शिंदेवाडी ते मसोबापाटी या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. याबाबत ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन, आंदोलनचा इशारा देवून पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांच्याकडेही याबाबत निवेदन देवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती. पाटील यांनी 20 ऑक्टोबरपर्यंत  ई-निविदा काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान या मागणीची दखल घेवून 17 ऑक्टोबरलाच कामाची निविदा काढली आहे. रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून गैरसोय थांबणार आहे. याबद्दल कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांचा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सत्कार करून ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.
 
Top