बार्टीतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ऑनलाईन जयंती साजरी
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,दिलावर सय्यद, कीर्ती शेलार, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हणमंत दणाने (तंटा मुक्ती अध्यक्ष वडगांव) हे होते. यावेळी समतादूत किरण चिंचोले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजप्रबोधन याविषयी माहिती दिली. त्यानंतर समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी बार्टीच्या एमपीएससी, युपीएससी, आय बी पी एस विषयी ऑनलाईन क्लासेसची माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक विजय गायकवाड, सचिन पवार, ज्ञानेश्वर पाटील, पंडित पवार, शिवाजी यल्लोरे, यासह समतादूत रमेश नरवडे, सुहास वाघमारे, गोविंद लोमटे, गणेश मोटे, अर्चना रणदिवे व इतर कर्मवीर प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी केले तर आभार अध्यक्ष हणमंत दणाने यांनी मानले.