Views


मित्रा च्या कौतुकासाठी तीस वर्षानी एकत्र आले वर्गमित्र


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 १९९० साली इयत्ता दहावी झालेल्या काही मित्रानी एक व्हाटसप ग्रुप तयार केला होता. माधव पवार यांची उस्मानाबाद भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड निवळ झाल्याचे कळले. चार पाच मित्रानी मिळुन आपल्या वर्गमित्राच कौतुक करायच ठरल व त्यानी तशी तयारी केली. चार दीवस प्रयत्न करुन त्यानी बऱ्याच मित्राना संपर्क केला. हे सर्व मित्र ३० वर्षानी एकत्र आली व आपल्या वर्ग मित्राचा सत्कार जेष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्या उपस्थितीत उमरगा तालुक्यातील दाळींब येथील ज्ञानदीप विद्यालयात सत्कार सोहळा कार्यक्रम घेतला. बरेच जण गेली तीस वर्ष एकमेकांना कधीच भेटले नव्हते पण या सत्काराच्या निमित्ताने जवळपास ४० मित्र एकत्र आले. सर्व बालमित्रानी मिळुन आगळा वेगळा कौतुक सोहळा साजरा केला. या साठी माधव पवार यांचे काही मित्र मुंबई, पुणे, सोलापुर, लातूर, कोराळ, लोहारा, सुंदरवाडी, आदी ठिकाणाहून आले होते. या सत्काराची चर्चा परीसरात एक चर्चेचा विषय ठरला आहे. या साठी विजय पाटील, शाहुराज माने, शफीक शेख, उस्मान कमाल, बब्रुवान सुरवसे, विनोद जाधव, यानी प्रयत्न केले. या वेळी रत्नदीप मिटकरी, दयानंद कांबळे, आरुन भगत, किशोर सुरवसे, विलास माने, बालाजी शिंदे, विष्णु कांबळे, संतोष भगत, राजेंद्र सुरवसे, नामदेव सांगवे, राजाराम सुरवसे,सुभाष जंगाले,रत्नाकर चव्हाण ,संभाजी जाधव, वसंत राठोड, शाम शिंदे, नयुम कारभारी, आयुब औटी, संजय जाधव, शिवाजी टिकांबरे, मुबारक शेख, संजय जाधव, वैराज कुलकर्णी, आदी वर्गमित्र उपस्थित होते. या वेळी माधव पवार यांनी सर्व वर्ग मित्रा चे आभार मानले. या वेळी राजेंद्र हुंजे यानी माधव पवार यांच्या कामा बद्दल व निष्ठेबद्दल कौतुक केल. आशा रीतीने एक आगळा वेगळा कौतुक सोहळा संपन्न झाला.
 
Top