Views


सोयाबीन पिकाचे अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानीचे बांधावर पंचनामे करण्यात यावेत -- छावा संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अमोल सिरसट

 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानीचे बांधावर पंचनामे करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन छावा संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अमोल सिरसट यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आनेक भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकाचे नुकसान झालेले आहे. ओल्या असणाऱ्या हिरव्या सोयाबीनच्या तसेच काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगा जागेवरच उगवत आहेत. सरकारी कर्मचारी व विमा कंपनी शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या सहाय्याने याची नोंदणी करण्यास सांगत आहेत. 90 टक्के शेतकऱ्यांकडे अशाप्रकारचे मोबाईल नसल्याने ज्यांच्याकडे आहेत. त्या शेतकन्यांना ही किचकट असनारी प्रक्रिया करणे अवघड असल्याने आपणास विनंती की, शासकीय कर्मचारी विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत पंचनामे करावेत व शेतकऱ्यांचे  होणारे नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन तात्काळ नुकसान भरपाई जाहिर करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबण्यास हात भार लावावा, अन्यथा नुकसानी मुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास यास विमा कंपनी व शासन जबाबदार राहील. तरी मोबाईल अॅपच्या किचकट प्रक्रियेव्दारे शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवावी व शासकीय कर्मचाऱ्यामार्फत पंचनामा करुन तात्काळ मदत जाहिर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
 
Top