भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या वाढदिवसांनिमित सेवा सप्ताह लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रम
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या वाढदिवसांनिमित दि.14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत लोहारा तालुका भाजपच्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रम भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील आष्टा मोड व भोसगा येथे वृक्ष लागवड, फळे वाटप करण्यात आले. तसेच लोहारा शहरात हायस्कूल शाळेच्या प्रांगणात भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी यांच्यावतीने वृक्ष लागवड व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणिस विक्रांत संगशेटटी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजप माजी तालुकाध्यक्ष प्रमाेद पाेतदार, वि.का.साेसायटी चेअरमन प्रशांत लांडगे, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, विजय महानुर, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धू गोपने, शंकर आप्पा मुळे, शिवशंकर हत्तरगे, बालासिंग बायस, प्रसन्न एकुंडे, बाळू पाटील, संतोष कुंभार, नागनाथ लोहार, बाळू माशाळकर, मल्लिनाथ फावडे, विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, समीर शेख, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.