Views


सैनिक सिताराम कावळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

दापेगाव ता.औसा जि.लातूर येथील, सिताराम संभाजी कावळे हे भारतीय सैन्यातून ३१ऑगस्ट रोजी, सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी केलेल्या देशसेवेचा गौरव म्हणून आपल्या गावातील लाडक्या सुपुञाचा दापेगाव ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ यांचे वतीने काल दि.८ सप्टेंबर रोजी , सायंकाळी ७वाजता त्यांचा सपत्निक व आई—वडीलांच्या समवेत सत्कार  करण्यात आला.या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.लक्ष्मीबाई गुलाब कावळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक प्रा.राजा जगताप (उस्मानाबाद) हे होते. सिताराम कावळे यांनी सैनिक म्हणून महर रेजीमेंटमध्ये कार्य करतांना  सुरवातीला फिरोजपूर पंजाब, जम्मु — काश्मिर,येथे भारतीय सिमेवर सेवा बजावली होती व त्यांनी सैनिक म्हणून केलेली कामगिरी व त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांची "जागतिक शांती सेनेत"२००५—२००६सालात साऊथ आफ्रिकेला, कांगो येथे निवड झाली होती. तेंव्हा तेथे ही त्यांनी चांगली सेवा बजावली होती. जागतिक शांती सेनेतील सेवा करून ते आपल्या भारत आल्यानंतर रांची उत्तराखंड, सिक्किम, नागालँड, मिझोरोम, अरूणाचल प्रदेश,या ठिकाणी सेवा बजावली होती. सैनिक म्हणून त्यांनी २० वर्षे सहा महिने सेवा करून निवृत्त झाल्याने, त्यांची मौजे दापेगाव येथे मोजक्या युवकांनी मीरवणूक काढली होती. गावच्या शिवेपासून ते गावापर्यंत जागोजागी गावातील ग्रामस्थांनी आपल्या गावच्या लाडक्या सैनिकाचे हार, तुरे, शाल, श्रीफळ, बुके देऊन स्वागत केल्याने गावात ऊत्साहाचे वातावरण व जल्लोष पाहवयास  मिळाला. मिरवणुक, झाल्यानंतर
सभा मंडपात सैनिक सिताराम कावळे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. लक्ष्मीबाई कावळे व ग्रा.पं.सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांनी सत्कार करताच टाळ्यांचा गडगडाट झाला. व "वीर जवान तुझे सलाम!" चा नारा सभा मंडपात निनादला. त्यांचे विविध व परिसरातील गावातील पाहुणे यांनीही सत्कार केले. गावातील ग्रामस्थांनी जंगी स्वागत मिरवणूक काढून केल्याने व जाहीर सत्कार केल्याने सैनिक सिताराम कावळे यांच्या डोळ्यातुन आनंदअश्रू निघाले. या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना  प्रा.राजा जगताप म्हणाले की, सिताराम कावळे यांनी सैनिक झाल्यानंतर पंजाबमध्ये कर्तव्य बजावतांना देशासाठी लढायचे म्हणून स्वत:हून जम्मु काश्मीरला ड्युटी मागुन घेतली व आपले शौर्य तेथे दाखवले व जागतिक शांती सैन्यातही त्यांनी साऊथ आफ्रिकेला कांगो येथे सेवा बजावली सिताराम कावळे यांनी देशसेवा करून आज ते सन्माने सेवानिवृत्त होताना दापेगाव ग्रामस्थांनी सोशेल डिस्टन्सिंगचे नियम पाळुन जल्लोषात जागो, जागी स्वागत केले. व गग्रामस्थांनी त्यांना भरभरूम प्रेम दिले व आपल्या लाडक्या सुपुञाचे कौतुक केलात त्याला तोड नाही. सिताराम कावळे यांचा आदर्श घेऊन दापेगावातील युवकांनी सैन्यात भरती होण्यासाठी मेहनत घ्यावी असे शेवटी त्यांनी आवाहन केले. यावेळी मुरलीधर सोनटक्के (माजी पं.स.सदस्य), साधु वाघे (डी.सी.बॅक चेअरमन पो.जवळगा), बळीराम पांडुळे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), आतिष कावळे (ग्रा. पं. सदस्य), गुलाब कावळे, सौ,संगिता राजा जगताप (ग्रा.पं. सदस्या टाकळी बें) बलभीम गायकवाड निलंगा, श्रीधर कांबळे सीरसल, प्रकाश कावळे , दत्ता शिताफे, बालाजी कावळे, आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी सैनिक सिताराम कावळे यांच्याबद्दल मुरलीधर सोनटक्के,प्रदिप कावळे यांनी आपल्या भावणा व्यक्त केल्या. आभार प्रकाश कावळे यांनी मानले.

 
Top