अ.भा. गरिबी निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वतीने सत्कार
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
लोहारा शहरातील इकबाल हुसेन मुल्ला यांची अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वतीने मुल्ला यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, बलासिंह बायस, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, शंकरआप्पा मुळे, पत्रकार अब्बास शेख, बाबा सुंबेकर, आदी, उपस्थित होते.