Views


मनसेच्या कोरोना योद्ध्याचा उस्मानाबाद मनसे तर्फे सोलापूर येथे सत्कार....

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

मनसेच्या कोरोना योद्ध्याचा उस्मानाबाद मनसे तर्फे सोलापूर येथे सत्कार,
शाहीर अमर शेख स्मारक संघर्ष समिती तर्फे ही आदरणीय बापू यांच्या समाजकार्याची दखल.
कोरोनाच्या या महाभयंकर आजारा मध्ये लॉक डाऊन काळात जनसामान्यांच्या समस्या काही प्रमाणात कमी करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष माननीय दिलीप बापू धोत्रे यांनी केलेले आहे,
  सोलापूर जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी मनसेचे कोरोना योद्धा म्हणून श्री दिलीप बापू धोत्रे परिचित झालेले आहेत,त्यांच्या या लोकपयोगी उपक्रमाची, समाजकार्याची दखल त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी ही घेतलेली आहे,
उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज सोलापूर येथे आदरणीय श्री दिलीप बापू धोत्रे यांची भेट घेऊन दिंनदुबळ्यांचा कैवारी असलेल्या श्री हरी पांडुरंगाची मूर्ती  भेट दिली,तसेच  शाहीर अमर शेख स्मारक संघर्ष समिती तर्फे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन,गोवा मुक्ती संग्राम,गिरणी कामगारांच्या लढ्याचे नेतृत्व करणारे, चिनी-पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा करणारे,शेतकऱ्यांसाठी शेतसारा वाढीविरोधात मोठे जन-आंदोलन उभारणारे लोकशाहीर अमर शेख यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
  यावेळी उस्मानाबाद मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट,महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा वैशालीताई गायकवाड,उप-जिल्हा अध्यक्ष शाबीरभाई शेख,सोलापूर मनसेचे शहर अध्यक्ष जैनुद्दीन भाई, मनसेचे काका गोरे,शाहीर अमर शेख स्मारक संघर्ष समितीचे अध्यक्ष,तथा मनसेचे उल्हासनगर शहर संघटक मा.मैनुद्दीन भाई शेख तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 
Top