Views


रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास बी.काॅम व बी.एस्स.सी भाग१ च्या अतिरिक्त तुकडीस शासनाची मान्यता

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बी.काॅम भाग१ व बी.एस्स.सी भाग १साठी फक्त एकच तुकडी होती त्यामुळे उस्मानाबाद शहरातील व परिसरातील अनेक विदयार्थी प्रवेशापासून वंचित राहत  होते. याकरिता महाविद्यालयाने बी.काॅम भाग 1 व बी.एस्सी.भाग 1 साठी अतिरिक्त तुकडी मिळावी म्हणून  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मार्फत महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने मंजुरी देऊन शैक्षणिक वर्ष 2020 - 21 पासून बी.कॉम्. भाग - 1 व बी.एस्सी. भाग -1 या वर्गाच्या अतिरिक्त तुकडी सुरु करण्याकरिता परवानगी दिली आहे. तरी बी.कॉम्. भाग -1 व बी.एस्सी. भाग -1 या वर्गामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

 
Top