शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने एक हजार साड्या वाटप
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते मुरुम येथे दि.6 सप्टेंबर रोजी गरीब महिलांना एक हजार साड्या वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद उस्मानाबादचे विरोधी पक्षनेते तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांचा वाढदिवस कोरोनाच्या महामारीमुळे शारीरिक अंतर ठेवून साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार महेश निंबरगे उपस्थित होते. यावेळी पत्रकार देवराज संगोळगे, राहुल कांबळे, रवी अंबुसे, प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, साम टीव्ही सोलापूरचे विश्वभुषण लिमये, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रविण गायकवाड आदींची उपस्थिती होती. अॅ ड पाशा इनामदार, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना महेश निंबरगे म्हणाले की, शरण पाटील यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविण्यात आला. मुरूम व पंचक्रोशीतील गोरगरीब महिलांना साड्या वाटप करून शरण पाटील मित्र मंडळाने एक आदर्श व कौतुकास्पद कार्य केल्याचे शेवटी ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरण पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू मुल्ला, उपाध्यक्ष नाना बेंडकाळे, गौस शेख, श्रीहरी शिंदे आदिंनी पुढाकार घेतला. यावेळी जावेद इनामदार, प्रा. आण्णाराव कांबळे, उल्हास घुरघुरे, जगदिश निंबरगे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.सुभाष हुलपल्ले तर आभार राजू मुल्ला यांनी मानले.