दुष्काळी अनुदान वंचित शेतकऱ्यांना वाटप करा -- भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील परंडा
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
2019 च्या दुष्काळी आनंदा अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे
अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, साल सन 2019 मध्ये परंडा तालुक्याची दुष्काळाची भयानक तीव्रता होती. आज रोजी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु अजूनही परंडा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे सदरील शेतकरी ऑक्टोबर व नोव्हेंबर 2019 च्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानीचे सक्षम अधिकाऱ्याकडून पंचनामेही करून ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले होते अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली होती. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान झाले व त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असे सर्व शेतकरी आज दुष्काळी यादि अनुदानापासून वंचित आहेत. तरी शासनाने अशा सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदानाचा विचार न करता सरसकट दुष्काळी अनुदान वाटप करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, कांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर काळे, साहेबराव पाडुळे, विलास खोसरे, तानाजी पाटील, अशोक भोळे, तुकाराम हजारे, किरण देशमुख, नामदेव काळे, रमेश पवार, नागेश गर्जे, तानाजी ठवरे ,बालाजी घोगरे, बाळासाहेब देशमुख, आदि, उपस्थित होते.