Views


*जिल्हा परिषदेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी....*
 
*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*
      उस्मानाबाद,(दि.25)जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
     शहरी आणि ग्रामीण गरिबांसाठी 25 सप्टेंबर 2014 पासून अंत्योदय योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
     यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार (सामान्य), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते
 
Top