Views




*कळंब उपजिल्हा रुग्णालयातील वेंटीलेटर व ऑक्सिजन सुविधा सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रास्ता रोको....*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)* 

कळंब,मागील सहा महिन्यापासून भारतात तसेच सबंध जगात कोरोणा महामारी ने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान मा. ना. नरेंद्रभाई मोदी यांनी तालुका स्तरापर्यंत व्हेंटिलेटर ची सोय उपलब्ध करून दिली आहे परंतु प्रशासनावर राज्यसरकारची व्यवस्थित पकड नसल्याकारणाने राज्यात बऱ्याच ठिकाणी पी एम केअर फंडातील व्हेंटिलेटर धुळखात पडून आहेत या बाबी साठी कळंब उपजिल्हा रुग्णालय देखील अपवाद नाही. या गंभीर गोष्टीची दखल घेत आज भारतीय जनता पक्ष कळंब तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वात छ. शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. यापूर्वी दोन वेळा निवेदन देऊन देखील व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा सुरू केली नव्हती यामुळे आज रास्ता रोको करून उपविभागीय अधिकारी कळंब यांना निवेदन देण्यात आले. व येत्या सात दिवसात योग्य त्या सुविधा न मिळाल्यास पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र असेल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर तालुकाप्रमुख अजित पिंगळे,रामहरी शिंदे,दिलीप पाटील,माणिक बोंदर, शिरिश पाटील,सतपाल बनसोडे,मिनाज शेख,राजाभाऊ बोराडे,गोपाळ चोंदे, संताजी वीर,शिवाजी गिड्डे,संतोष कस्पटे, शिवाजी बाराते, रामकिसन कोकाटे, अनिल टेकाळे,शंकर यादव,अरुण चौधरी,संजय जाधवर, सुरेश कोरे,सोमनाथ टिंगरे,सादिक बेग,प्रशांत लोमटे,कचरू नवगिरे,विजय शितोळे,संदीप बाविकर,इम्रान मुल्ला,गणेश देशमुख, निलेश दिवाने,अशोक क्षीरसागर व इतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top