अभिनेत्री कंगना रानावत यांच्या या वक्तव्याचा कळंब येथे शिवसेना व युवासेनैच्या वतीने रानावत यांच्या प्रतिमेस जोडे मारूण निषेध व्यक्त करण्यात आला.
कळंब:-(प्रतिनिधी)
मुंबईची तुलना पाकिस्तानशी करूण अपशब्द काढल्याबद्दल अभिनेत्री कंगना रानावत यांच्या या वक्तव्याचा कळंब येथे शिवसेना व युवासेनैच्या वतीने रानावत यांच्या प्रतिमेस जोडे मारूण निषेध व्यक्त करण्यात आला.
कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना व युवासेनेच्या वतीने अभिनेत्री कंगना रानावत यांनी केलेल्या अपशब्दाबद्दल निषेध व्यक्त करूण जोडे मारण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे,युवा सेना संपर्क प्रमुख नितिन लांडगे,शहरप्रमुख प्रदीप मेटे,युवा सेना तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे,उपसरपंच सचिन काळे,अॅड.मंदार मुळीक,नगरसेवक मुश्ताक कुरेशी,सतीश टोणगे,सुरेश शिंदे,सुनिल गायकवाड, कृष्णा हुरगट,युवा सेनेचे शहराध्यक्ष गोविंद चौधरी,उमेश जाधव,करण घुले,रनजित टेकाळे,अतुल मडके,प्रशांत तौर,सुनिल काळे,अंकुश कदम,शुभम पवार,बापु जोगदंड आदी शिवसैनिक उपस्थित होते.