Views




माजी पं.स. सदस्य सुधीर घोडके यांनी सामाजिक भावना जपत सापडलेले पैशाचे पाकीट परत केले, यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

माजी पं.स. सदस्य सुधीर घोडके यांनी प्रामाणिकपणे सामाजिक भावना जपत सापडलेले पैशाचे पाकीट परत केले. त्यांच्या या प्रमानिक पणामुळे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सुधीर घोडके यांना लोहारा शहरातील  एसबीआय बँकेजवळ पाकीट सापडले. या पाकीटमध्ये  3970 रु.होते. यानंतर पाकीट व पैसे पोलीस स्टेशनमध्ये संबधीत व्यक्तीची चौकशी करून बेलवाडी येथील सुनील धनाजी चव्हाण यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पो.नि.अशोक चौरे, पो.काॅ.अनिल बोधमवाड, जगताप, पोपट क्षिरसागर. विजयकुमार कोळी, बेलवाडीचे सरपंच दादा पाटील, आयुब शेख, आदि, उपस्थित होते.
 
Top