Views


महिला बचत गटांना सेवा व्ययसायिकांना मायक्रो फायनान्स कंपनीने दिलेले कर्ज माफ करावे -- लहुजी शक्ती सेना लोहारा तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 महिला बचत गटांना सेवा व्ययसायिकांना मायक्रो फायनान्स कंपनीने लोहारा शहरात व तालुक्यात दिलेले कर्ज माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेना लोहारा तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात अनेक महिला बचत गटांना सेवा व्ययसायिकांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडुन कर्ज वितरण करण्यात आले. हया पुर्वीचे सर्व बचत गटांचे व खाजगी कंपन्यांचे घेतलेले कर्ज परतफेड केलेले आहे. मात्र कोरोनाच्या काळात लाॕकडाऊन, जनता कर्फ्यु, संचारबंदी अशा कारणाने हाताचे काम गेल्याने पोटाची उपजिविका भागविणे अवघड झाले. अशा परिस्थितीत हफ्ते भरणे कठीण झाले. या काळात मायक्रो फायनान्स कंपन्याकडुन कर्ज परतफेड / वसुलीबाबत तगादा [सक्तीने] वसुली करीत आहेत. अशा परिस्थितीत कर्ज वसुली करणे चुकीचे असुन कोरोनाच्या काळातील संपुर्ण मुद्दल व व्याज माफ करावे, सद्यपरिस्थिती पाहता संबंधित जबाबदार यांनी महिला बचत गट तसेच इतरही वैयक्तिक वाटप केलेले कर्ज माफ करावे, अन्यथा लहुजी शक्ती सेना लोहारा तालुका यांच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे लोहारा तालुका अध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे,हयुवा तालुका अध्यक्ष विकी मोरे, तालुका उपाध्यक्ष आकाश चिमुकले, तालुका सपंर्क प्रमुख नितीन रोडगे, मिडिया तालुका अध्यक्ष बालाजी कसबे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा विमल शिंदे, उपाध्यक्षा पुजा देडे, शहरध्यक्षा रेखा सरवदे, आदि, उपस्थित होते.

 
Top