Views


भाजपा नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार 


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भाजपा उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस माधव पवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल उमरगा शासकीय विश्रामगृह येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपा लाेहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल, भाजपा उमरगा तालुका सरचिटणीस सिद्धेश्वर माने, गुलाब डोंगरे, अमर वरवटे, नितीन खमीतकर, अमर करके, लोकेश बिराजदार, महादेव भुरे, दगडु तिगाडे, बालाजी चव्हाण, प्रमोद पोतदार, यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top