Views
शहरातील नालीवरील पुल, कचरा व्यवस्थापन ई. प्रलंबीत समस्यांबाबत मा. मुख्याधिकारी यांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा दिला इशारा


कळंब:-(प्रतिनिधी)

 शहरातील बाबा नगर भागातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकातुन येणारा मुख्य रस्ता, वारे हाॅस्पीटल शेजारील नालीवरील पुल, कचरा व्यवस्थापन ई. प्रलंबीत समस्यांबाबत बाबा नगर भागातील युवकांनी मा. मुख्याधिकारी यांना निवेदन देवून आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
         बाबा नगर भागात सत्ताधारी मंडळी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या भागातील नाल्या ची साफसफाई केली जात नाही, या भागातील पुलाला मोठे भगदाद पडले असून,अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. या भागात रस्त्यावरच पाणी साचत असल्याने  व रस्त्यावर खड्डे असल्याने खड्यात रस्ते अशी  परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागाकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
     निवेदनावर लक्ष्मीकांत गिरी, बबलु गोरे, सुभाष शिंदे, गजानन शिंपले, शंकर टिंगरे उमाकांत गिरी,विशाल बाकले,दीपक मंडळे,संतोष कांबळे,बाळासाहेब पांचाळ,संदीप गायकवाड,सोमनाथ माने,गणेश खामस्वडीकर, विवेक सलके,शुभम कान गुदे, कृष्णा पवार,रवींद्र राऊत, संकेत कणसे, अमोल पवरे, सुशांत लोमटे, श्रीकांत तवले, सुनील गोरे आदिंच्या सह्या  आहेत..
 
Top