Views


छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांचे नावे बिडी वरुन हटवा व सदरील कारखान्याच्या मालकांवर गुन्हे दाखल करा -- भाजपा अल्पसंख्याक प्रदेश मोर्चा चिटणीस तथा शहराध्यक्ष ॲड.जहीर चौधरी


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे बीडी उद्योगावर असलेले नाव तात्काळ बदलणे बाबत कारखान्यास आदेशित करणेबाबत व त्याकरिता चालू असलेल्या शिवधर्म फाउंडेशन आंदोलनास व आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देत आहोत, अशा मागणीचे निवेदन भाजपा अल्पसंख्याक प्रदेश मोर्चा चिटणीस तथा भाजपा परंडा शहराध्यक्ष ॲड.जहीर चौधरी यांनी परंडा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडी उद्योगावर नाव असून त्याची विक्री संपूर्ण महाराष्ट्रभर होत असल्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची विटंबना होत असून महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे सदरील बीडी उद्योगावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांची नावे या उद्योगावर तात्काळ बदलण्यात यावेत व सदरील उद्योग समुहाच्या मालकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच महाराष्ट्रभर चालू असलेल्या शिवधर्म फाउंडेशन यांचे आंदोलनास व आमरण उपोषणास भारतीय जनता पार्टी परंडा शहर व तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. तसे न झाल्यास भाजप परंडा शहर व तालुका यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपा अल्पसंख्याक प्रदेश मोर्चा चिटणीस तथा भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचीटनीस विठ्ठल तिपाले, ॲड अभयसींह देशमुख, ॲड. तानाजी गरड, अशोक भोळे, यांच्या सह्या आहेत.

 
Top