Views


*उपजिल्हा रुग्णालय मोर्शी,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे अहोरात्र परिश्रम करून देताहेत रुग्णांना आधार*

अमरावती:-

मोर्शी तालुक्यात आरोग्य विभाग,पोलीस,महसूल,नगर परिषद, ग्रामपंचायत प्रशासन ही सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी दक्ष आहे मोर्शी शहर व गावोगावी व कंटेन्मेंट झोनमध्ये घरोघरी भेटी देऊन फ्रंट लाईनवर काम करीत सर्व्हे करणारा आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या या सर्व यंत्रणेचा कणा ठरत आहेत याशिवाय उपजिल्हा रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र मोर्शी शहर व मोर्शी ग्रामीण भागातील सेवा या अविरत सुरू ठेवून तालुक्यातील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी करीत आहेत उपविभागीय अधिकारी श्री. नितीनजी हिंगोले, तहसीलदार श्री. सिद्धार्थ मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत महाजन, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीताताई ठाकरे,आरोग्य सभापती सागर भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांना आधार देत आहेत मोर्शी येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय मुलींचे वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू आहे या कार्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.धोटे सर,डॉ.जैन मॅडम,डॉ.झामडे मॅडम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश भगत,आशिष पाटील,स्वाती बुरंगे,सुवर्णा बिजवे, आरोग्य सहाय्यक विनायक नेवारे,विनय शेलुरे,आरोग्य कर्मचारी प्रकाश मंगळे, सुधाकर कडू,रितेश कुकडे,नीलकंठ ठवळी,योगेश पोहकार,डी एम आरलवाड,राधाकिसन वैद्य,प्रशांत बेहरे,शरद रायबोले,मुरलीधर काळे,अजय भागवत,चंद्रसेन जाधव,तुषार पोहकार,राहुल भोसले आहेत

 
Top