काजळा येथील रामानंद महाराज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा उत्साहात शुभारंभ आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून 15 लाखाचा निधी सभागृहामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज मंदिर सभागृह कामाचा ह.भ. प. नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते गुरूवारी दि. 3 सप्टेंबर रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सभागृहासाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून 15 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काजळा गावचे ग्रामदैवत श्रीरामानंद महाराज मंदिर परिसरात सार्वजनिक सभागृह नसल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे रामानंद महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहमध्ये भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी आ. ठाकूर यांच्याकडे सभागृहासाठी निधीची मागणी केली होती. याची तातडीने दखल घेवून आ. ठाकूर यांनी मंदिर सभागृहासाठी 15 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या सभागृह कामाचा शुभारंभ सोहळा गुरूवारी ह.भ. प. नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, पंचायत समिती सदस्य प्रदीप शिंदे, सरपंच शशिकला शिंदे, उपसरपंच विजयदत्त पाटील, हभप राम महाराज सुतार, हभप उमेश महाराज पाटील, हभप व्यंकट महाराज पवार, ग्रामपंचायत सदस्य राजुळ पवार, हरिभाऊ शिंदे, सुर्यकांत सुतार, दैवशाला क्षीरसागर, संजिवनी माळी, शालिनीबाई शिंदे, मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप शेळके, माजी सरपंच पांडुरंग खोचरे गुरूजी, किशोर मसे, राजाभाऊ मसे, औदुंबर पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, नानासाहेब ढवण, नानासाहेब शिंदे गुरूजी, अण्णा मडके, अरविंद लिंगे, भाऊ माळे, राजेश हाजगुडे, उमेश पवार, रविंद्र आहेर, शिवाजी हाजगुडे, विनोद बाकले, तुषार चव्हाण, कलीम शेख, शाहरुख सय्यद, दत्ता रणदिवे, सुरज रणदिवे आदींसह भाविक उपस्थित होते. सद्गुरूंसाठी यापुढेही निधीसाठी प्रयत्न करणार काजळा गावचे ग्रामदैवत, हजारो भाविकांचे श्रध्दास्थान श्री सद्गगुरू रामानंद महाराज मंदिर परिसरासाठी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी 15 लाखाचा निधी दिला आहे. तसेच यापुढेही मंदिर व परिसरात विविध विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी दिली.