Views








ईगल फाउंडेशनचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 ईगल फाऊंडेशनच्यावतीने  कोरोना महामारीच्या कालावधीत तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींची निवड समितीद्वारे नुकतीच नावे जाहीर करण्यात आली आहेत. येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे (राजकीय), अँड.संभाजीराव मोहिते (सामाजिक), सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे (प्रशासकीय), निलेश चव्हाण (उद्योजक),  गणेश शेळके (प्रशासकीय), डॉ.सौ.भुमिका प्रतापसिंह बेरगळ (महिला विकास), डी.एस.काटे (अर्थ विषयक प्रख्यात लेखक व उद्योजक), शिवाजी चव्हाण (शिक्षण), प्रा.सतिश साठे (शिक्षण), डॉ.जितेंद्र अहिरराव (वैद्यकीय), पोपट नलावडे (सामाजिक), डॉ.संजय थोरात (वैद्यकीय), प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले (शिक्षण), प्रशांत चव्हाण (पत्रकार), खंडू दुधभाते (माजी सैनिक), अभिमन्यु शिंदे (शिक्षण), पाकिजा पटेल (शिक्षण), राहूल कुंभार (शिक्षण), श्रीकांत सोनवणे (पत्रकार), निवृत्ती सदगीर (शिक्षण), विजय विश्वासराव (शिक्षण), सागर भाट (शिक्षण), डॉ.हरिदास विधाते (शिक्षण), भारत चव्हाण (कला), रामकिशन रौंदळे (राजकीय), धनाजी बेलेकर (शिक्षण), सौ.पुनम पाटील (उद्योजिका), सौ.संगिता शिवाजी शिंदे (सामाजिक), सुरेश राजे (शिक्षण), मनिषा चौधरी (शिक्षण), शिवलाल राठोड (सरपंच), आयेशा नदाफ (शिक्षण) या सर्व मान्यवरांना ईगल फौंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात लवकरच गौरवण्यात येणार आहे. सदर सत्कारमूर्तिची निवड झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शेखर सुर्यवंशी, प्रकाश वंजोळे, सुभाष भोसले, प्रा.तुकाराम पाटील, बाबासाहेब राशिनकर, प्रा.स्मिता गिरी, संजय नवले, प्रा.डॉ.महेशकुमार मोटे, प्रा.सर्जेराव राऊत, अशोक शिंदे, राजेश जोष्टे आदींनी नावे जाहीर केले आहेत.

 
Top