Views


लोहारा तालुक्यात सुसाट वारे वादळासह झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी -- भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यात दिनांक 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या दरम्यान सुसाट वारे वादळासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार विजय अवधाने यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील बहुतांश गावात दिनांक 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या दरम्यान सुसाट वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस, कांदा, मुग, उडीद,  सोयाबीन, कोथिंबीर, यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. यंदा कमी अधिक प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे व शेतकऱ्यांनी व्याजाने व उसनवारी पैसे काढून शेतात हजारो रुपयांचे नामांकित कंपनीचे बी बियाणे, औषधे खरेदी करून पेरणी केली. मेहनत व मशागतीमुळे शेतात चांगल्या बहरात व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवलेले व सध्या काढणीसाठी आलेल्या बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लोहारा तालुक्यातील लोहारा बु, माकणी, जेवळी, सास्तूर, या चारही महसूल मंडळात मागील 4 दिवसात मोठ्या प्रमाणात वादळीवारे सुटुन त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेटली असून बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे व कुटुंबीयांचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतातील पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यावर जमा करावी, जेणे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ येत्या 8 ते 10  दिवसाच्या आत आर्थिक मदत करावी, अन्यथा लोहारा तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजप मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, बालासिंह बायस,  कमलाकर सिरसाठ, यांच्या सह्या आहेत
 
Top