Views


परंडा तालुका दुष्काळी अनुदान 2019 संदर्भात आमदार सुजितसिंह ठाकूर यांची तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्याशी फोनवरून चर्चा

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

दरम्यान परंडा तालुका 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यामूळे दुष्काग्रस्त जाहीर केला होता. दि. 2 सप्टेंबर 2020 रोजी चर्चा केली असता एकूण अनुदानाची रक्कम 24.89 कोटी आहे. तालुक्यातील एकूण बाधीत शेतकरी संख्या 47826 आहे. त्यांचे क्षेञ 35162 इतके आहे. त्यापैकी जिरायती शेतकऱ्यांना शासन नियमानुसार हेक्टरी 6800रु व फळबाग व बागायती शेतकऱ्यांना  हेक्टरी 18000 रु काल icici बॕकेतून ट्रान्सफर करण्याची सुरवात झाली आहे, असे सांगितले. यापैकी आज 89 गावातील 28830 खातेदारांना अनुदान बॕकेकडे सोडले आहे. याची रक्कम 15 कोटी 17 लाख 10485 इतकी आहे. उर्वरीत अनुदान दोन दिवसात शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहीती आ.सुजितसिंह ठाकूर यांना तहसीलदार यांनी दिली.

 
Top